आता मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःच हे प्रमाणपत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. आता मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःच हे प्रमाणपत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दिनांक 6 सप्टेंबर रोजी जळगाव आरोग्य विभागाकडून मिळालेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. हे प्रमाणपत्र आज भाजपचे नेते गिरिश महाजन यांनी मीडियासमोर दाखवले. यावेळी, ' अनेक प्रयत्न करून देखील सामान्य लोकांना अपंग प्रमाणपत्र लवकर मिळत नाही. एकनाथ खडसे यांना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे?' असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.
COMMENTS