‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजून जावे की, दिवाळी आता जवळ आली आहे.
वेब टीम
मुंबई - ‘दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या’…. , ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजून जावे की, दिवाळी आता जवळ आली आहे. दसरा गेला की, दिवाळी सणाचे वेध लागतात. दिवाळी सणाची माहिती घेताना दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवसांची माहिती घेणे गरजेचे असते. कारण दिवाळीच्या शुभेच्छा तर आपण देतोच. पण दिवाळीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाचा फार महत्व आहे. लक्ष्मीपूजन हे वेगवेगळ्या पद्धतीने पण मनोभावे केले जाते. लक्ष्मी पूजनाची माहिती घेताना लक्ष्मी पूजन विधी जाणून घेणे गरचेचे आहे. लक्ष्मीपूजन अगदी साग्रसंगीत करण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी लक्ष्मी पूजन विधी मराठी जाणून घेऊया. तसंच लक्ष्मीपूजन केल्यावर शेअर करण्यासाठी खास लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी.
लक्ष्मीपूजन म्हणजे काय ?
दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला खूपच जास्त महत्व आहे. वेगवेगळ्या स्तरातील लोक हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व आहे. लक्ष्मी पूजनासंदर्भातील अनेक कथा, दंतकथा या प्रसिद्ध आहेत. लक्ष्मी पूजनाची माहिती जाणून घेताना लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली ते माहीत करुन घेणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गासाठी हा अत्यंत महत्वाचा असा दिवस मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी जे समुद्रमंथन झाले त्या दिवशी त्या समुद्र मंथनातून लक्ष्मीची निर्मिती झाली. त्यामुळेच शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्यानंतर येणाऱ्या अमावस्येला कालीमातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पण बदलत्या कालांतराने दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत सुरु झाली. पण दुसऱ्या माहितीनुसार दिवाळीचा काळ म्हणजे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी ही पृथ्वीवर संचार करते. आपल्या निवासासाठी ती योग्य असे स्थान शोधते (लक्ष्मी चंचल असते) असे म्हणतात ज्या व्यक्ती या खऱ्या, संयमी, दानशूर, धर्मनिष्ठ आणि पतिव्रत्या किंवा सच्च्या असतात अशा व्यक्तींच्या घरी लक्ष्मी ही राहणे पसंत करते. या शिवाय असे सांगितले जाते की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. कारण काही ठिकाणी लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. लक्ष्मीपूजन विधी जाणून घेणे देखील गरजेचे आहे.
दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे
यंदा म्हणजेच 2021 मध्ये लक्ष्मी पूजन हे 4 नोव्हेंबर 2021 या दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेपर्यंत आहे. आता लक्ष्मी पूजन नेमके कसे करावे ते जाणून घेऊया. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि झेंडुची फुले असलेले तोरण लावावे. घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी घरात गंगाजल शिंपडावे. लक्ष्मीपूजनासाठी एखाचा चौरंग किंवा पाट घ्यावा त्यावर लाल रंगाचे कापड घालावे. थेट चौरंगावर पूजा मांडू नये.
चौरंग किंवा पाटाच्या आजुबाजूला रांगोळी काढावी. तांदुळ घेऊन त्याचे स्वस्तिक लाल रंगाच्या कपड्यावर काढावे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. आंब्याची पाने आणि नारळ ठेवून तो कलश बसवावा. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीचे स्थान असते. म्हणून त्या ठिकाणी कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. फुलांची आरास करुन देवांना अक्षता वाहून घ्याव्यात. देवी लक्ष्मी मातेसमोर नाणी ठेवावीत. उदबत्ती, दिवा लावून आता मनोभावे देवीचे नाम: स्मरण करावे. लक्ष्मी मातेची आरती करुन तिला नैवेद्य दाखवून पाया पडावं. अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजन विधी करावे त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल. अशा पद्धतीने पूजा करुन तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.
लक्ष्मीपूजन विधी करतानाचे नियम
लक्ष्मी पूजन सुरु असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करु नयेत. त्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते.
लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात म्हणजे लक्ष्मीचे स्वागत तुम्ही करत आहात असा त्याचा अर्थ होतो.
लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी.
पूजाविधी सुरु असताना गाणी किंवा नाच करु नये. त्यामुळे पूजा नीट होत नाही.
खूप जण फारच घाईत आणि कसेतरी पूजा करतात तसे मुळीच करु नये.
लक्ष्मीपूजनाच्या आधी देव्हारा आणि देवपुजेचे साहित्य स्वच्छ करुन घ्यावे.
देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवैद्य दाखवला तरी चालतो.
दिवाळी 2021 लक्ष्मीपूजन मुहूर्त
अमावस्या तिथी 04 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:03 पासून सुरू होईल आणि 05 नोव्हेंबर रोजी पहाटे 02:44 वाजता संपेल. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 06:09 ते रात्री 08:20 पर्यंत आहे. पूजेचा कालावधी 01 तास 55 मिनिटे आहे.
माता लक्ष्मीला अर्पण करा हा नैव्यद्य
फळांमध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजेत सिंघडा, डाळिंब, श्रीफळ अर्पण करू शकता. दिवाळीच्या पूजेत सीताफळही ठेवले जाते. सिंघडा नदीच्या काठावर आढळतो म्हणून माता लक्ष्मीला तो खूप आवडतो असे मानले जाते. मिठाईमध्ये लक्ष्मीला केसरभात, केशरयुक्त तांदळाची खीर, हलवा इत्यादी पदार्थ आवडतात.
COMMENTS