रात्री केस धुतले तर ते पूर्णपणे सुकवून मगच नंतर झोपा.
केस चांगले मऊ , लांब, मजबूत आणि सुंदर दिसावेत यासाठी महिला नेहमी प्रयत्नशील असतात. त्या नेहमी काही नवीन तेल किंवा शाम्पू तसेच इतर काही वेगवेगळी औषधे वापरून बघत असतात जेणेकरून त्यांचे केस सुंदर दिसावेत,केळगळती थांबावी. परंतु सारखेच केसांची देखरेख करणे सोपे काम देखील नाही. फक्त केमिकलयुक्त औषधेच नाही तर दररोज होणार्या काही छोट्या-मोठ्या चूकामुळे देखील केस वेगाने खराब होऊ शकतात . सौंदर्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला तुमचे केस जास्त कालावधीसाठी चांगले ठेवायचे असतील तर ओल्या केसात पुढील 7 कामे चुकूनही करू नका. (Hair beauty tip)
1. ओले केस विंचरणे किंवा ओल्या केसात ब्रश करणे –
ओले केस खुप कमजोर असतात आणि अशावेळी ब्रश केल्यास ते सहजपणे तुटतात. यासाठी ते पूर्णपणे सुकल्यावरच कंगवा फिरवा.
2. ओल्या केसांवर हिटिंग टूल्सचा वापर करणे –
महिला काही वेळा ओल्या केसांवरून स्ट्रेंटनर फिरवतात . याप्रकारचे हिटिंग टूल्स केसांसाठी चांगले मानले जात नाही. ओल्या केसात तर ते आणखी खराब रिझल्ट देतात. केस सुकल्यानंत त्याचा वापर करा.
3. ओले केस बांधणे –
ओले केस बांधणे नुकसानकारक आहे. ओले केस कमजोर असल्याने ते बांधल्यास तुटू लागतात. केस सुकल्यानंतर पोनीटेल करा.
4. ओल्या केसात ब्लो-ड्राय करणे –
ओल्या केसांवर ब्लो ड्राय करणे नुकसानकारक आहे. केस सुकल्यानंतरच ते करा. मुख्यतः ड्रायरची सेटिंग मीडियमवर ठेवावी.
5. ओले केस हवेत सुकवणे –
ही नैसर्गिक पद्धत नसून यामुळे केस विस्कळीत होऊन फणी फिरवल्यावर केस तुटतात. टॉवलने रगडून, फटके मारून केस सुकवल्याने तुटतात.
6. ओले केस असताना झोपणे –
जास्त ओले असलेले केस घेऊन झोपल्याने स्कॅल्पच्या फोलिसेलचे नुकसान होते. रात्री केस धुतले तर ते पूर्णपणे सुकवून मगच नंतर झोपा.
7. ओल्या केसांवर हेअर स्प्रे लावणे –
जर केसांना स्टाईल करण्यासाठी हेयरस्प्रेचा वापर केला तर ते कोरड्या केसांवर लावल्याने केस सुरक्षित राहतात आणि स्टायलिंग सुद्धा चांगली होते. मात्र ओल्या केसांवर हेयरस्प्रे लावल्याने केसांचा आकार काही वेळानंतर बदलू लागतो. (Hair beauty tips).
COMMENTS