भारतीय घरांच्या परंपरेत हळदीचे महत्त्व सर्वांच्या परिचयाचे आहे. स्वयंपाकघरात हळदीचा वापर असो वा लग्नात हळदीचा विधी असो किंवा पूजामध्ये हळदीचा वापर असो
वेब टीम
हेल्थ डेस्क - भारतीय घरांच्या परंपरेत हळदीचे(Turmeric)महत्त्व सर्वांच्या परिचयाचे आहे. स्वयंपाकघरात हळदीचा वापर असो वा लग्नात हळदीचा विधी असो किंवा पूजामध्ये हळदीचा वापर असो, प्रत्येक घरात हळदीला विशेष महत्व आहे.
- मजबूत हाडे - अर्धा चमचा हळद अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये(Milk)मिसळून झोपण्यापूर्वी प्या
- मजबूत हिरड्या - अर्धा चमचा हळद(Turmeric) चिमूटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरड्यांची मालिश करा चमकदार दात अर्धा चमचा हळदी मध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिसळून दात घासा
- सर्दी - पडसे ताप -एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा
1. विद्यार्थ्यांसाठी हळदीचा वापर
जर तुमच्याकडे शिक्षण घेणारी मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या अभ्यासासाठी हळदीचा उपयोग करू शकता. कच्ची हळद पेस्ट बनवून मुलांच्या कपाळावर लावा. असे केल्याने त्यांची एकाग्रता वाढते. दररोज आंघोळ झाल्यावर विद्यार्थी त्यांच्या कपाळावर हळदीचा टिळा देखील लावू शकतात. असे केल्याने मन शांत राहते आणि चांगले शिक्षण मिळविण्यात मदत होते.
2. रोगांपासून मुक्ती मिळवणे
सध्याच्या वातावरणात दुर्बल प्रतिकारशक्तीमुळे लोकं करोनाला बळी पडत आहेत, अशा परिस्थितीत हळद रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हळद पाणी प्यायल्याने तुमची आजारांपासून मुक्तता होऊ शकते आणि त्याचबरोबर दुधात उकडलेली कच्ची हळद प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
COMMENTS