Loading ...

$type=ticker$snippet=hide$cate=0

जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या...

आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही.



"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 

तो जिजाऊचा शिवबा झाला, 

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 

तो राधेचा श्याम झाला, आणि 

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 

तो सीतेचा राम झाला !'

वेब टीम 

मुंबई - आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिला दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. पण तरी आजही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. ज्यामुळे त्यांना पुरूषांपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जाते. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. महिला किंवा स्त्री म्हटले म्हणजे सध्या एक महत्वाचे स्थान निर्माण करणारी, स्वत: पुढे येऊन अनेक अडचणींना सामोरे जाणारी बाई आपल्या डोळ्या समोर उभी राहते. महिलांना सध्या एक आदराचं स्थान दिलं गेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं कर्तुत्व सिद्ध करू बघते आहे. घरसंसार असो किंवा नोकरी आपली जबाबदारी ती नेटकी पार पाडते आहे. एक कलेक्टर, अधिकारी, नोकरी किंवा व्यवसाय करणारी ती, आई, ताई, मुलगी, पत्नी अशा कितीतरी भुमीका निभावणाऱ्या या स्त्रीला ८ मार्च रोजी विशेष सन्मान दिला जातो. 

खरं तर फक्त ८ मार्च महिला दिन मनवून फायदा नाही, म्हणजे एकच दिवस आपल्या आई, बहीण, मैत्रीण यांना special अनुभव देऊन फायदा नाही. त्यांना रोजच आनंद देणे आपले कर्तव्य आहे. 

तिला भिती वाटत नाही, म्हणून ती खंबीर नाही,

तर ती भयापुढेही नमत नाही, म्हणून ती शक्तीशाली आहे

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,

स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.

आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू,

झाशीची राणी तू,

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू,

जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो,

मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,

माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा...

जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या

प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा...

स्री म्हणजे वास्तव्य,

स्री म्हणजे मांगल्य,

स्री म्हणजे मातृत्व,

स्री म्हणजे कतृत्व,

आज जग कितीही प्रगती करत असेल, पण कौटुंबिक जबाबदा-या सांभाळण्यासाठी महिलांनाच सर्वोत्तम मानले गेले आहे. आजही आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक दिसतात, जे महिलांना चार भिंतीत कैद करून ठेवणे हा त्यांचा धर्म मानतात. अशा लोकांनी कधीही दुर्लक्षित करू नये की स्त्रियांबद्दल आदर आणि प्रेम दर्शविणे हे देखील जीवनातील सर्वात मोठे कर्तव्यच आहे.

महिला आज केवळ त्यांच्या हक्कांसाठीच लढत नाहीत तर आपली स्वप्न पूर्ण करण्यास देखील त्या जागरूक आहे. अशा परिस्थितीत जेव्हा महिला दिन म्हणजेच स्त्रियांना समर्पित दिवस आहे. तर मग त्यांच्यासाठी हा दिवस खास का बनविला जाऊ नये? पण त्याआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की महिला दिन का साजरा केला जातो?

महिला दिन कधीपासून सुरू झाला?

खरं तर हे संपूर्ण प्रकरण १९०८ साली घडले जेव्हा न्यूयॉर्क शहरातील १५ हजार महिलांनी मोर्चा काढून ऑफिसचे तास कमी करण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर यावेळी त्यांनी अधिक पगाराची तसेच मतदानाच्या हक्काचीही विनंती केली होती. या दिवसाच्या बरोबर एक वर्षानंतर म्हणजेच १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पक्षाने हा दिवस पहिला राष्ट्रिय महिला दिन म्हणून घोषित केला, जो २८ फेब्रुवारीला साजरा केला गेला. दोन वर्षांनंतर म्हणजेच १९१३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तारखांमध्ये बदल केला गेला. त्यानंतर महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करण्यास सुरवात केली गेली आहे. 

स्त्रिया गृहिणी असो किंवा नोकरी करणा-या, त्यांच्या सुट्टीचा कोणताही निश्चित दिवस नसतो. कार्यालयीन कामानंतरही त्यांना घरातील उर्वरित कामे घरी आल्यानंतर करावी लागतात. पण तुम्ही इच्छा असल्यास या दिवशी त्यांना एक दिवस कामातून मुक्त करू शकता. आपल्या हृदयाच्या सर्वात जवळच्या स्त्रीला खास वाटण्यासाठी तुम्ही तिचा वर्कलोड आपल्या डोक्यावर घेऊ शकता. या दिवशी घरी जेवण बनवण्यापासून घराची साफसफाई करण्यापर्यंत सर्व जबाबदा- घेऊन तिला चांगले वाटू शकते. आराम देऊ शकता.

जर या महिला दिनी तुम्हाला आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या महिलांना खास वाटण्यासाठी आपण त्यांना आपल्या स्वत:च्या हातांनी बनविलेले कार्ड भेट देऊ शकता.  आपल्यासाठी ती इतकी महत्त्वाची का आहे हे त्यांना समजावून सांगा. तसेच त्यांच्याशिवाय तुमचे आयुष्य किती अपूर्ण आहे हे देखील यातून तिला पटवून द्या.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 


COMMENTS

Name

accident,46,agreeculture,1,Agriculture,6,ahmednagar,58,Amaravati,2,army,3,aurangabad,14,Automobile,4,Bank,3,beed,7,Bharat Jodo Yatra,1,bollywood,107,Booster dose,1,Boycott,1,bra,1,braking,9,break,1,Breaking,274,Budget,4,business,14,corona,304,cricket,35,crime,135,CRPF,1,Cyclone,1,Education,12,Election,15,Employment,1,Entertainmen,9,Entertainment,583,Exam,1,Festivals,8,Flood,1,Food,10,Fraud,11,Health,876,healthdesk,14,Hollywood,1,Horoscope,121,ind,1,Independence day,2,India,1375,Industry,2,IPL,4,Jalgaon,1,Jobs,1,Lifestyle,29,lockdown,8,m,2,Maharashtra,3292,maharashtra-,36,Maharshtra,125,Maratha aarakshan aarakshan Strike OBC,1,metro,1,Mission Moon,1,mumbai,771,nagpur,5,nashik,7,National,49,NCC,1,OBC Aarakshan,1,Omicron,87,Online Gaming,2,Palghar,1,Pandharpur,1,politics,714,politics india,2,Pollution,1,President,3,Pune,47,Rain,6,Recipe,3,Republic Day,1,Result,1,s,1,saport,2,school,6,solapur,2,spiritual,1,Sport,97,sports,92,Stock Market,6,Suicide,2,Technology,4,Terrorist Attack,1,threefriends,1,Tollywood,9,Travels,3,TV,20,USMANABAD,3,Vaccination,35,vedanta foxconn,1,Wedding,1,WHO,1,World,163,दिल्ली,7,नवी दिल्ली,975,
ltr
item
Global Sahyadri : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates: जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या...
जागतिक महिला दिनाचा इतिहास आणि महत्त्व, जाणून घ्या...
आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही.
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj-ywXA6TF27UoovQnoUzhVNZN1UM7nmTfTr7BgtHhYrVW9OTf5cO1YWzVwWyMf5Z6ac8-yfUr_QFg1XUw5SeNt-sur0hTmESkvPuHGXAVHVr_qUZic_nmNG0tdH23UwjV2_I77qEV87RMDUAr9MQfkKG9kjbd2iFy48KST4-ffds4mVx5i-AYuPtagEg=s16000
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEj-ywXA6TF27UoovQnoUzhVNZN1UM7nmTfTr7BgtHhYrVW9OTf5cO1YWzVwWyMf5Z6ac8-yfUr_QFg1XUw5SeNt-sur0hTmESkvPuHGXAVHVr_qUZic_nmNG0tdH23UwjV2_I77qEV87RMDUAr9MQfkKG9kjbd2iFy48KST4-ffds4mVx5i-AYuPtagEg=s72-c
Global Sahyadri : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.globalsahyadri.in/2022/03/Global-sahyadri-womens.html
https://www.globalsahyadri.in/
https://www.globalsahyadri.in/
https://www.globalsahyadri.in/2022/03/Global-sahyadri-womens.html
true
3780596804343198828
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content