लांबसडक केसांसाठी वेणी बांधण्याची सवय लावून घ्या यामुळे केसगळती केस तुटणे समस्या कमी होण्यास मदत मिळेल वेणी बांधल्याने केसांची चांगली वाढ होते
वेब टीम
हेल्थ डेस्क - लांबसडक केसांसाठी वेणी बांधण्याची सवय लावून घ्या यामुळे केसगळती केस तुटणे समस्या कमी होण्यास मदत मिळेल वेणी बांधल्याने केसांची चांगली वाढ होते अशी माहित एक संशोधनाद्वारे समोर अली आहे. वेणीमुळे केसाचा गुंता होत नाही आणि केस तुटण्याचाही त्रास कमी होतो. याव्यतिरिक्त केसांच्या मुळांवर ताण देखील येत नाही. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते यासाठीच मोकळ्या केसाऐवजी वेणी बांधावी.
केसांचे मॉईश्चर ठेवते राखून
धूळ, प्रदूषण यामुळे केस डॅमेज होणे आपल्याला नवे नाही. उन्हात, प्रदूषणात प्रवास करताना केस कोरडे होऊ लागतात. केस कोरडे झाल्यानंतर केसांना फाटे फुटणे, केस रुक्ष दिसणे, केस सतत गळणे अशा तक्रारी जाणवू लागतात. जर प्रवासाला बाहेर निघताना किंवा बाईकवरुन प्रवास करताना केस वर बांधण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या केसांची वेणी घातली तर तुम्हाला त्याचा फायदा अधिक मिळेल. कारण तुमच्या केसांचे मॉईश्चर राखून ठेवण्यास वेणी मदत करते. शिवाय प्रवासात केस चिकट आणि तेलकट करत नाही.
अशी बांधा रात्री वेणी
रात्री झोपताना केसांवर एकदा तरी हेअर ब्रश किंवा कंगवा हा फिरवायलाच हवा. केसांचा गुंता सोडून मस्त केसांची तीन पेढ्याची सैलसर वेणी बांधा. सगळयात शेवटी केसांना रबर लावा. खूप घट्ट असा रबरही लावू नका. कारण तुम्हाला वेणी बांधण्यामुळे झोपताना त्रास व्हायला नको. आता केसांची उत्तम वाढ हवी असेल आणि तुमचेही केस छान चमकदार, मजबूत दिसायला हवे असतील तर केसांची वेणी घालायला विसरु नका.



COMMENTS